उपबाजार

काटोल सब मार्केट

कृषि उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार हा शहराच्या मध्यभागी आहे. उप बाजार आवार 0.83 हेक्टर (1.97 एकर) मध्ये पसरलेला आहे.दिनांक 11 जानेवारी 1990 रोजी हा बाजार उपबाजार आवार म्हणुन घोषीत झाला. या बाजार आवाराची जागा समितीच्या मालकीची असुन या बाजार आवारावर समितीने शेतकरी व व्यापारी यांच्या सोईच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यात मुख्यत: शेतकरी निवास, लिलाव शेड, गोदाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व समितीच्या मुख्य कार्यालयाची दोन मजली सर्व सोयीयुक्त इमारत बांधण्यात आली. या मुख्य कार्यालयातुनच समितीचे सर्व कामकाज 1 मार्च 2013 पुर्वी पावेतो चालविण्यात येत होते. या इमारती मध्येच शेतकऱ्यांकरीता शेतकरी निवास आहे.

या बाजार आवारात शेतकऱ्यांचा कृषि माल साठवण्या करीता दोन धान्य गोदाम बांधण्यात आले आहे. त्यांची क्षमता अनुक्रमे 800 व 500 मे. टन अशी आहे. गोदामा मध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांनी साठविलेल्या शेतमालावर माफक असे रुपये 2 प्रति महीना प्रति पोते असे दर आकारण्यात येतात. ज्या शेतकऱ्यांना पैशाची निकड असुन त्याला आपला शेतमाल विकायचा नसल्यास त्या शेतकऱ्यासाठी या बाजार समितीने पणन मंडळा व्दारे राबविण्यात येणारी शेतमाल तारन योजना राबविलेली आहे त्या करीता शेतकऱ्याचा चांगल्या दर्जाचा शेतमाल 95 किलोच्या बारदाना भर्ति मध्ये समितीच्या गोदाममध्ये साठवुन त्या ऐवजी त्याला आजच्या बाजार भावानुसार त्याला त्याच्या शेतमालाच्या किंमतीच्या 75% रक्कम तारण योजने मधुन अदा करण्यात येते. शेतकऱ्याला दिलेल्या तारण म्हणुनच्या रक्कमेवर बाजार समिती 180 दिवसांकरीता 6% व्याज आकारण्यात येते. या बाजार आवारात अडत्यांच्या व व्यापाऱ्यांच्या व्यवहारीकसोयी करीता दुकान गाळे उभारण्यात आले. बाजार आवारात असलेल्या विहीरी व्दारे मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.