उपबाजार

उपबाजार कोंढाळी

कृषि उत्पन्न बाजार समिती काटोलचा उपबाजार आवार कोंढाळी येथे असुन तो आवार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पासुन नजिक वर्धा रोडवर आहे. या बाजार आवारा करीता लागलेली जागा 1981-82 साली घेण्यात आली उपबाजार आवार कोंढाळीचा परिसर 2.84 हेक्टर (6.91 एकर) मध्ये पसरलेला आहे. या उपबाजार आवारात सर्वच नियमीत कृषि मालाची आवक होते. या उपबाजार आवारात होणारा मुख्य व्यवसाय सोयाबिन तुर, चना, ज्वारी, भुईमुग, गहु, उडिद, मुग, तिळ, संत्रा, मोसंबी, गुरेढोरे, शेळया व मेंढया तसेच कापुस या शेतमालाचा होतो. हा बाजार आवार सुरु करण्या मागे काटोल तालुक्यातील कोंढाळी नजिकच्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल अधिक दुर वर न नेता नजिकच कोंढाळी येथे विकता यावा या करीता या बाजार आवाराची काटोल कृषि उत्पन्न बाजार समिती व्दारे 20 जानेवारी 1983 रोजी तत्कालीन संचालक मंडळाव्दारे स्थापना करण्यात आली. या बाजार आवारात 03 लिलाव शेड असुन 01 शेतमाल गोदाम आहे. या उपबाजार आवारात कृषि उत्पन्न बाजार समिती काटोल व्दारा सन 1986-87 ला गोदामाचे बांधकाम करण्यात आले. गोदामाची स्थापीत क्षमता 1000 मे.टन एवढी आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशाची निकड असुन त्याला आपला शेतमाल आताच्या कमी बाजार भावात विकायचा नसल्यास त्या शेतकऱ्यासाठी या बाजार समितीने पणन मंडळा व्दारे राबविण्यात येनारी शेतमाल तारण योजना राबविलेली आहे त्या करीता शेतकऱ्याचा चांगल्या दर्जाचा शेतमाल 95 किलोच्या बारदाना भरती मध्ये समितीच्या गोदाममध्ये साठवुन त्या ऐवजी त्याला आजच्या बाजार भावानुसार त्याला त्याच्या शेतमालाच्या किंमतीच्या 75% रक्कम तारण योजने मधुन अदा करण्यात येते. शेतकऱ्याला दिलेल्या तारण म्हणुनच्या रक्कमेवर बाजार समिती 180 दिवसांकरीता 6% व्याज आकारण्यात येते.