बाजार समिती स्थापने विषयक माहिती
काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना त्या वेळच्या मध्यप्रान्त व वऱ्हाड राज्य शासनाच्या अधिसुचना क्र. 1242-1068-10 दिनांक- 29 जुलै 1940 अन्वये झाली असुन त्या वेळी फक्त कापुस हया शेतमालाचे खरेदि विक्रीचे नियमन या बाजार समिती मार्फत होत असे.
त्या नंतर मा. आयुक्त नागपुर विभाग नागपुर यांची अधिसुचना क्र. सी.ओ.पी.- 56 काटोल दिनांक- 08 जुलै 1960 अन्वये या बाजार समितीला कापुस बाजार समिती ऐवजी कृषि उत्पन्न बाजार समिती असे संबोधन्यात येवु लागले आणि बाजार समितीचे क्षेत्र बाजार आवाराचे 4 मैल परीसरा पुरते मर्यादित करण्यात आले. त्या नंतर सदर्हु बाजार समितीचे कार्यक्षेत्रात काटोल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रापुरते वाढविण्यात येवुन या क्षेत्रात खालील कृषि मालाचे खरेदि विक्रीचे नियंत्रन करण्यात आले. जसे कापुस, ज्वारी, गव्हु, तुर, चना, उडीद, मुंग, व इतर धांन्य तसेच गुरे-ढोरे, शेळया-मेंढया व संत्री मोसंबी .
काटोल कृषि उत्पन्न बाजार समिती अ वर्गीय बाजार समिती आहे. काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना दिनांक. 29 जुलै 1940 ला झाली असुन प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात ही त्याच दिवशी झाली. काटोल कृषि उत्पन्न बाजार समिती कडे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये 3 बाजार आवारांचा समावेश आहे.
- मुख्य बाजार आवार काटोल
- उपबाजार आवार काटोल
- उपबाजार आवार कोंढाळी
- बसस्टॉप जवळील जुनी कार्यालयाची ईमारत.
काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना दिनांक- 29 जुलै 1940 ला झाली व याबरोबरच या बाजार समितीचे प्रथम सभापती होण्याचा बहुमान श्री. माणिकरावजी राऊत यांना लाभला या नंतर श्री. लक्ष्मीनारायनजी राठी यांनी सन 1941 ते 1952 पर्यन्त सभापती पदाचा कार्यकाळ भुषविला सन 1952 ते 1955 पर्यन्त श्री. सुदेवजी व्यास यांनी या बाजार समितीवर सभापती पदाचा कार्यकाळ भुषविला. त्यानंतर श्री. लक्ष्मीनारायनजी राठी यांनी पुन्हा 1955 ते 1960 पर्यन्त बाजार समितीचे सभापतीपद भुषविले. यानंतर श्री. कस्तुरचंदजी चांडक यांनी 1960 ते 1971 पर्यन्त यशस्वीरीत्या सलग 11 वर्ष सभापती पदाचा मान वाढविला दिनांक 23 सप्टेंबर 1971 रोजी या बाजार समितीचे सभापती पद या भागाचे सहकार महर्षी श्री. केशवरावजी डेहनकर (दादा) यांनी स्वीकारले. ज्यांनी की स्व. श्री. माणिकरावजी राऊत यांच्या व्दारे लावलेले कृषि उत्पन्न बाजार समिती रुपी वटवृक्ष याचे ना केवळ संगोपन केले तर त्याला सुजलाम सुफलाम सुध्दा केले. त्यांचा हा यशस्वी सभापती पदाचा कार्यकाळ दिनांक- 11 नोव्हेंबर 1993 पर्यन्त कायम राहीला. हा 22 वर्षाचा कार्यकाळ काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या इतीहासातील सर्वाधीक कार्यकाळ राहीला. या नंतर या बाजार समितीचे सुत्र श्री. ताराचंदजी गोतमारे यांच्या कडे गेला ज्यांनी दिनांक- 12 नोव्हेंबर 1993 रोजी या बाजार समितीचे सभापती पद स्वीकारले. त्यांनी सुध्दा त्याच्या कार्यकाळात या बाजार समितीच्या हीतावह अनेक सुदृढ निर्णय घेतले. त्यांनी या बाजार समितीचे सभापती पद दिनांक- 21 जानेवारी 1999 पर्यन्त भुषविले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत श्री. केशवरावजी डेहनकर यांच्या नेतृत्वात त्यांचा गट पुन्हा सत्तारुढ झाला त्यांनी दिनांक - 22 जानेवारी 1999 ला सभापती पद स्वीकारले त्यांचा हा यशस्वी कार्यकाळ दिनांक- 23 डिसेंबर 2004 पर्यन्त कायम राहीला त्यानंतर दिनांक 24 डिसेंबर 2004 ते 20 ऑक्टोंबर 2011 पर्यन्त या बाजार समितीवर शासकीय प्रशासकांची राजवट राहीली या दरम्यान या बाजार समितीला कुठलेही विधायक कार्य करता आले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांना हितावह असे निर्णय घेता आले नाही. दिनांक - 21 ऑक्टोंबर 2011 रोजी श्री. बापुरावजी सातपुते याच्या कुशल नेतृत्वात प्रशासकीय मंडळ सत्तारुढ झाली. ज्यामध्ये श्री. बापुरावजी सातपुते मुख्य प्रशासक होते. त्यांच्या नेतृत्व कार्यकाळात बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात दोन धान्य लिलाव शेडच्या कामास महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या संमतीने बांधकामास सुरुवात झाली श्री. बापुरावजी सातपुते यांचा कार्यकाळ दिनांक - 21 जुलै 2012 पर्यन्त कायम होता. सन 2012 ला झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडनुकी मध्ये नविन संचालक मंडळ सत्तारुढ झाले. या संचालक मंडळानी आपला कार्यकाळ दिनांक - 22 जुलै 2012 रोजी सुरु केला. या संचालक मंडळाचे नेतृत्व श्री. दिनेशजी ठाकरे यांनी स्वीकारले. व त्यानंतर श्री. तारकेश्वर महादेव शेळके यांनी 2014 पासुन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदाचा पदभार 2021 पर्यंत पदभार स्विकारला.
आक्टोबर 2021 मध्ये बाजार समितीची निवडणुक झाली या निवडणुकीमध्ये मा. श्री. चरनसींगजी ठाकुर यांच्या कुशल नेतृत्वात संचालक मंडळ सत्तारुढ झाले. या संचालक मंडळानी आपला कार्यकाळ दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु केला. मा. श्री. चरणसींगजी ठाकुर यांनी असलेल्या अनुभवाच्या जोरावर बाजार समितीची सभापती धुरा यशस्वी रीत्या सांभाळण्यास सुरुवात केली. यांनी काटोल बाजार समितीला प्रगतीच्या वाटेवर नेले व एक अग्रगन्य बाजार समिती म्हणून लौकीक प्राप्त करुन दिला. काटोल तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत देणे तसेच शेतक-यांची गाय, म्हैस, बैल अपघाताने किंवा सर्पदंशाने मृत्यु झाल्यास त्यांना आर्थिक मदत करीत आहेत. तसेच या समितीमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांचा महत्वाचा सन बैलपोळा साजरा केला जातो या मध्ये शेतकऱ्यांना आकर्षक बक्षीस दिले जाते. बाजार समिती व्यवस्थापन अंत्यत काटकसरीने काम करीत असून शेतकरी हिताचे दृष्टीने जे निर्णय घेतले ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. अनेक शेतकरी हितोपयोगी उपक्रम बाजार समिती मध्ये सुरु करणारी भारतातील एकमेव बाजार समिती आहे.
